चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली असून वाढलेल्या आणि घटलेल्या टक्केवारीने संभ्रम वाढला आहे. उमदेवारांसह त्यांच्या समर्थकांमध्येही विजयाचे दावे-प्रतिदावे सावधपणे केले जात आहेत. अनेक ठिकाणी शेवटच्या दोन दिवसांत लढतीचे चित्र बदलले. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली आहे.