Arjuni Morgaon Assembly election : आमदार चंद्रिकापुरेंचा 'प्रहार'मध्ये प्रवेश,अर्जुनी मोरगाव विधानसभेत तिरंगी लढतीचे चित्र

Arjuni Morgaon Vidhan Sabha 2024 : अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तिकीट कापल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पूत्राला निवडणुकीत उतरवण्याची तयारी आहे.
Arjuni-Morgaon Vidhan Sabha 2024
Arjuni-Morgaon Vidhan Sabha 2024sakal
Updated on

गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पूत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरेंसह गुरुवारी (ता. २४) प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.