माजलगाव : माजलगाव विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गाव-भेटी व प्रत्यक्ष मतदारांच्या भेटींवर भर दिला जात आहे. अपक्ष उमेदवार रमेश आडसकर, महाविकास आघाडीचे मोहन जगताप, महायुतीचे प्रकाश सोळंके या तीन साखर कारखानदारांविरूध्द उद्योजक माधव निर्मळ व ओबीसी नेते म्हणून ओळख असलेल्या बाबरी मुंडे यांची झुंज दिसून येत आहे.