इस्लामपुरात कांटे की टक्कर! निशिकांत पाटलांचं जयंतरावांसमोर आव्हान; अजितदादांचा 'तो' डाव होणार यशस्वी?

Islampur Assembly Election 2024 : जयंतरावांना भाजपशी पूर्वापारचा दोस्ताना इथे दुर्लक्षून चालणार नाही. हे जयंतरावांचे सर्व डाव निशिकांत यांना नवे नाहीत.
Sangli Politics Nishikant Patil vs Jayant Patil
Sangli Politics Nishikant Patil vs Jayant Patil esakal
Updated on
Summary

जयंतरावांचे पारंपरिक विरोधक आमदार सदाभाऊ खोत सध्या तरी मुंबईतील फोटो फ्रेमध्ये दिसत आहेत. गौरव नायकवडी मुंबईहून परतल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ आहेत.

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यविरोधात एकच उमेदवार देण्यासाठी यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा डाव टाकण्यात आला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू अशी ओळख असलेल्या निशिकांत यांच्यासमोर आता जयंतरावांच्या विजयाचा वारू रोखण्याचे आव्हान असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.