जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज छाननीवेळी जालना मतदारसंघात कैलास गोरंट्याल व अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या माहितीबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल आक्षेपामुळे येथील निर्णय रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला नव्हता. दरम्यान, रात्री साडेअकरा वाजेनंतर गोरंट्याल व खोतकर या दोघांचेही अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आले.