धरणगाव : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात २००९ ते २०१४ नंतर सलग तिसऱ्यांदा विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी सुसाट निघाली आहे. विरोधकांची सर्व रणनीती व प्रचार गुलाबराव पाटील यांनी फोल ठरविला. महायुती सरकारचे कार्य, लाडकी बहीण योजना, तरुणाईमध्ये असलेले गुलाबराव पाटील यांचे आकर्षण, जीव ओतून काम करणारे काही कार्यकर्ते, निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन, मुख्यमंत्री शिंदे यांची धरणगावमधील सभा, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रामाणिक साथ आदी गोष्टींमुळे श्री. पाटील यांचे मताधिक्य आणि विजय निश्चित असल्याची चर्चा कार्यकर्ते करीत होते.