जालना : जालना विधासनभा मतदारसंघात बहुरंगी निवडणूक होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना रोखण्यासाठी भाजप मैदानात उतरले आहे. भाजप महानगराध्यक्ष अशोक पांगारकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना पक्षातून आव्हान देत अब्दुल हाफिस हे मैदानात आहेत. त्यामुळे मुस्लिम मतफुटी रोखण्याचे गोरंट्याल यांच्यासमोर आव्हान आहे. त्यात वंचितकडून डेव्हिड घुमारे हे रिंगणात उतरले आहेत.