महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.
जत : ‘‘गेल्या काही दिवसांत माझ्या उमेदवारीवरून अनेकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. जातीपातीचे विष पेरण्याचा गंभीर आरोप केला. मात्र, विक्रम सावंत, विलासराव जगताप हे माझे शत्रू नाहीत. येथील दुष्काळ अन् जतवर लागेलला दुष्काळी कलंक हा माझा शत्रू आहे. येथील मायमाऊलीच्या हातात असणारा कोयता कायमचा बंद करायचा आहे, यासाठी मला एक संधी द्या, येथील चेहरामोहरा बदलून टाकू,’’ असे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांवरही टीका केली.