Jayadatta Kshirsagar : तो’ निर्णय नाईलाजाने पण आता योग्य दिशा ठरविणार! माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका

Beed Vidhan Sabha Election 2024 : बीडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून सांगितले.
jaydatta kshirsagar
jaydatta kshirsagarsakal
Updated on

बीड : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवारी, ता. चार) माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अचानक अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. मात्र, आता त्यांनी तो निर्णय परिस्थितीनुरुप नाईलाजाने कोण्याही कार्यकर्त्यांना न विचारता घेतला. परंतु, आता सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच योग्य निर्णय घेणार असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवर लिहिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.