महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व राष्ट्रवादी हे मराठी माणसांनी उभे केलेले दोन राजकीय पक्ष भाजपने तोडण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले. ते शहापूरमध्ये आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते. तसेच, यावेळी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भावली पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचे म्हटले.