महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत . सर्वच पक्षांचे आपापले विजयाचे दावे आहेत. एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याशिवाय अजित पवारांबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. अटकेच्या भीतीने अजित पवार भाजपसोबत निघून गेल्याचे ते म्हणाले आहेत.