Kolhapur Politics: जयश्री जाधवांना मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' जबाबदारी; स्वतः जाधवांनी सांगितलं पक्ष साेडण्याचं कारण

Jayashri Jadhav: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार होते.
Kolhapur Politics: जयश्री जाधवांना मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' जबाबदारी; स्वतः जाधवांनी सांगितलं पक्ष साेडण्याचं कारण
Updated on

ठाणे: विद्यमान आमदार असूनही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महिला भगिनींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात महिलांच्या प्रगतीसाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या त्या कोल्हापूरातील सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहचवण्यासाठी त्या नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत त्यांच्याकडे एकप्रकारे नवीन जबाबदारीच सोपवली आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.