‘‘मागील विधानभा निवडणुकीवेळी आम्ही थांबलो हीच आमची चूक झाली. आता माघार नाही.''
सांगली : ‘‘सांगली विधानसभा निवडणूक मी लढणार आहे. म्हटल्याप्रमाणे शेवटपर्यंत ठामच आहे. आता कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही,’’ असा निर्धार सांगली विधानसभेसाठीच्या उमेदवार जयश्री मदन पाटील (Jayshree Madan Patil) यांनी व्यक्त केला. काँग्रेस भवनाशेजारील वसंतदादा भवन याठिकाणी आज सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा आपल्याचा पाठिंबा असल्याचेही सांगितले.