मुंबई: जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये तणाव वाढला असून संघर्षाने उग्र रूप धारण केले आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारावर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे दोन्ही गटांमध्ये वातावरण तापले, परिणामी मातोश्री क्लबमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला.