घाटगे (Samarjeet Ghatge) यांना काँग्रेस, उबाठा शिवसेना तसेच गडहिंग्लजमधून जनता दलाच्या स्वाती कोरी (Swati Kori) यांचा पाठिंबा होता.
Kagal Assembly Election Results : कागल विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांच्यावर त्यांनी ११ हजार ६३२ मतांनी हा विजय संपादन केला. हसन मुश्रीफ यांना एक लाख ४५ हजार २५७ मते मिळाली, तर समरजीतसिंह घाटगे यांना एक ३३ हजार ६२५ मते मिळाली.
कागल विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पालकमंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांच्यातच खरी लढत होती.