"दलित समाजाला आता त्यांचे भावनिक भाषण नको. पंचवीस वर्षांत दलित समाजातील किती तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सहकार्य केले, हे जाहीरपणे सांगावे."
म्हाकवे : ‘विरोधकांकडून मतदारांना विविध आमिषे दाखवली जात असून, मतदारांकडून शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मत द्यायचे नाही, असा निर्धार कागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने केला आहे’, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी व्यक्त केला. बानगे (ता. कागल) येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बाबूराव हिरुगडे अध्यक्षस्थानी होते.