"समरजितसिंह घाटगे यांनी सिध्दनेर्लीतील दलित समाजाची जमीन काढून घेऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे."
कोल्हापूर : ‘हसन मुश्रीफ यांनी आयुष्यभर शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा जोपासली. समाजातील गोरगरीब जनतेला आधार दिला. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा प्रामाणिक नेता आहे. त्यांना कोणतेही लेबल लावू नका,’ असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केले. कागल यथे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.