गतवेळी शहरातील जनता दल मुश्रीफ यांच्या मागे होती. तेव्हा त्यांना दोन हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
गडहिंग्लज : कागल विधानसभा मतदारसंघातून (Kagal Assembly Constituency) माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विजयी झाले; पण १३० कोटींची विकासकामे आणूनही त्यांना गडहिंग्लज शहरातील अपेक्षित मताधिक्याला मुकावे लागले. त्यांना केवळ ९०२ चे मताधिक्य मिळाले. जनता दलाच्या साथीने समरजित घाटगे त्यांच्या जवळपास जाऊन पोहोचल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे.