मंडलिक यांनी १९६२ मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून कॉंग्रेसचे (Congress) उमेदवार शामराव भिवाजी पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
Kagal Assembly Constituency : राजकारणात विरोधक हा प्रत्येक टप्प्याटप्प्यावर समोर येत असतो. त्याच्यावर मात करत आपला झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न सारेच करत असतात. एखाद्या मतदारसंघात पारंपरिक राजकीय विरोधक असतात. त्यांच्यातील लढती या त्या मतदारसंघाची ओळख ठरलेल्या असतात. राजकारणातील विद्यापीठ म्हणून परिचित असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक (Sadashivrao Mandlik) व दिवंगत माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्यातील राजकीय वैर जिल्ह्याने अनुभवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात या दोघांनी एकमेकांविरोधात चार वेळा शड्डू ठोकला. त्यात दोनदा मंडलिक, तर दोनदा घाटगे यांनी विजय मिळवला.