'जनतेचे ॠण या जन्मीच काय, सात जन्मीही फेडू शकत नाही, आयुष्यभर हमाल बनून सेवा करू'; असं का म्हणाले मुश्रीफ?

Kagal Assembly Elections Hasan Mushrif : ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे.
Kagal Assembly Elections Hasan Mushrif
Kagal Assembly Elections Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

''गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कागल तालुक्यातील गटबाजीला मूठमाती देऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.''

कागल : ‘उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकगंगेला आलेल्या या महापुरापुढे मी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालीत आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ॠण या जन्मीच काय, सात जन्मीही फेडू शकत नाही. सहाव्यांदा आमदारकीची संधी द्या, संपूर्ण आयुष्य जनतेचा हमाल बनून सेवा करू,’ असे भावनिक आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.