‘चाळीस हजार शेतकऱ्यांकडून मुश्रीफ यांनी शेअर्सपोटी पैसे घेतलेत. पण, ते या कारखान्याचे सभासदच नाहीत. याबाबत अद्याप ते काही बोलत नाहीत.'
बाचणी : ‘दीर्घ मुदत कर्ज म्हणजे काय? हे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना चांगले माहीत आहे. तरीही शाहू साखर कारखान्यावरील (Shahu Sugar Factory) कर्जाबद्दल बोलणाऱ्या मुश्रीफ यांनी त्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे जाहीर करावीत. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा समावेश असेल, तर त्या क्षणाला उमेदवारी मागे घेतो’, असे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी दिले.