‘दलित समाज व छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे पिढ्यान् पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. या ऋणानुबंधातून उतराई होण्याची संधी समरजितसिंह घाटगे यांना आमदार करून दलित समाजाला मिळाली आहे.’
कागल : छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घाटगे घराण्याचे दलित समाजाशी (Dalit Community) ऋणानुबंध आहेत. दीपावलीच्या पूर्वसंध्येला याच कौटुंबिक नात्यातून कागल मतदारसंघातील वैचारिक लढाईमध्ये आंबेडकरी चळवळीतील आरपीआयच्या विविध पक्ष, संघटनांनी दिलेली साथ माझ्यासाठी मोठा आशीर्वादच आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी केले.