''मराठा समाजाच्या हिताच्या आड येणारी ही कृती कुणाच्या दबावामुळे केली जात असल्याचा प्रश्न मराठा समाजातून उपस्थित होत आहे.''
कागल : ‘मराठा समाजातील नागरिकांनी पुराव्यांशी कुणबी दाखल्यासाठीचे (Kunbi Caste Certificate) प्रस्ताव सादर केले असतील, तर ते प्रशासनाला द्यावेच लागतील. त्यासाठी कागलमध्ये कुणाचा दबाव येत असेल, तर मला स्वतः लक्ष घालावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण, कुणबी दाखले आणि इतर लाभ मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’, अशी ग्वाही संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी दिली.