'गद्दारी केलेल्यांना महाराष्ट्र प्रायश्चित देतोच, दोन मराठा नेत्यांचे पक्ष फोडलेल्यांना..'; जयंत पाटलांचा मुश्रीफांवर थेट वार

Kagal Constituency Politics : गद्दारांचे विसर्जन करून त्यांना प्रायश्चित देण्यासाठी निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरचा मुहूर्त शोधला आहे.
Kagal Constituency Politics Jayant Patil
Kagal Constituency Politics Jayant Patil esakal
Updated on
Summary

जयंत पाटील म्हणाले, 'समोरच्यांचे पूर्वीचे गुरू आता समरजित घाटगेंच्या मागे उभे आहेत. हीच घाटगेंची मोठी ताकद आहे.'

गडहिंग्लज : ‘कागल मतदारसंघातील (Kagal Constituency) एक नेते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार हे फक्त एकदाच या मतदारसंघात येऊन गेले. तो ट्रेलर होता. खरा सिनेमा २० तारखेच्या आधी दिसेल. केवळ ट्रेलरमुळे या नेत्याचा तोल ढळू लागला आहे. तोल गेल्याने आणि समोर पराभव दिसू लागल्याने त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर येत आहेत’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे नाव न घेता केली.

राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट) येथे शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, समरजितसिंह घाटगे, डॉ. नंदिनी बाभूळकर, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, व्ही. बी. पाटील, आर. के. पवार, रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, सभेतील प्रत्येक वक्त्यांनी आपल्या भाषणातून मुश्रीफ यांना टार्गेट केले.

Kagal Constituency Politics Jayant Patil
Raju Shetti : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढविणार'; बेळगावात राजू शेट्टींची मोठी घोषणा

जयंत पाटील म्हणाले, ‘गद्दारी केलेल्यांना महाराष्ट्र प्रायश्चित देतोच. दोन मराठा नेत्यांचे पक्ष फोडलेल्यांना आणि आपापले पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांचे विसर्जन करून त्यांना प्रायश्चित देण्यासाठी निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरचा मुहूर्त शोधला आहे. हा मुहूर्त जनतेने वाया घालवू नये.’ खासदार कोल्हे म्हणाले, ‘निष्ठेचे प्रतीक असलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पावन भूमीचा अभिमान असेल, तर पक्षाशी व नेत्याशी प्रतारणा केलेल्यांचा तितकाच तिटकारा करा. हा तिटकारा दाखविण्याचा मुहूर्त ठरला आहे. उपभोगशून्य स्वामीत्वचा अर्थ काहींना न कळणाऱ्यांच्या तोंडून अपशब्द बाहेर येत आहेत. तो त्यांच्या नजरेचा दोष आहे. घाटगेंची मनाची श्रीमंती पाहून त्यांना साथ द्यावी.’

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘गेली पाच वर्षे गडहिंग्लज भागातील जनतेचा विश्वास कमावण्यासाठी काम केले आहे. पुढील पाच वर्षे काय काम करायचे याचे धोरण नसल्यानेच मुश्रीफांच्या तोंडून शिव्या बाहेर येताहेत. मंत्रिपद असतानाही त्यांनी आंबेओहोळ व हद्दवाढ का केली नाही? कागल व गडहिंग्लजमधील अनेक वसाहतींतील घरांचे प्रॉपर्टी कार्ड नाहीत. त्यांना आता हक्काचे घर देणे, औद्योगिक वसाहतीत उद्योग आणणे, फुटबॉल खेळाडूंना सुविधा देणे हे माझे व्हीजन आहे. विरोधकांच्या टीकेला हे व्हीजनच उत्तर आहे. यामुळे जनतेने परिवर्तनाची सुरुवात कागलमधून करावी.’ यावेळी मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, व्ही. बी. पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, अमर चव्हाण यांची भाषणे झाली. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज बरगे यांनी आभार मानले. यावेळी गडहिंग्लज व कागल तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kagal Constituency Politics Jayant Patil
Chandgad Assembly Seat : 'अजित पवार भाजपला योग्य दखल घ्यायला लावतील'; असं का म्हणाले हसन मुश्रीफ?

लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना...

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘घाटगे यांनी विरोधकांच्या विकास पुस्तिकेचा उल्लेख केला. चार कॉन्ट्रक्टरांसाठी केलेल्या कामांची ही पुस्तिका असल्याचेही ते म्हणाले. यावरून राज्यातील लाडकी बहीण योजनेबरोबरच कागल मतदारसंघात आता लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे की काय, असे वाटत आहे.’ यावर उपस्थितांत हशा पिकला.

Kagal Constituency Politics Jayant Patil
सनातन धर्माच्या नावाखालील राजकारण, हिंसेला विरोध; धर्मसंसदेचा जाहीरनामा प्रसिद्ध, नेमकं काय आहे जाहीरनाम्यात?

दोन पदव्या...निवडणूक जिंकली

जयंत पाटील म्हणाले, ‘समोरच्यांचे पूर्वीचे गुरू आता समरजित घाटगेंच्या मागे उभे आहेत. हीच घाटगेंची मोठी ताकद आहे. मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. त्याला समरजित सिंह घाटगे हेच एकमेव उत्तर आहे. तोल गेल्यानेच आतापर्यंत या नेत्याने घाटगेंना दोन पदव्या दिल्या आहेत. त्यातच घाटगेंनी निवडणूक जिंकली आहे.’

साहेब, हे वागणं बरं न्हवं...

शेख म्हणाले, ‘गरिबांच्या कल्याणासाठी काम केल्याचा आव मुश्रीफ आणत आहेत. तसे असते तर ते पवारांना सोडून गेले नसते. मुश्रीफ यांनी रोजगार हमीवर काम करून पैसे मिळविलेले नाहीत, तर पवारांनी दिलेल्या पदांच्या माध्यमातून ते मिळवलेत. म्हणून मुश्रीफसाहेब, तुमचं हे वागणं बरं न्हवं.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.