डोंबिवली: विधानसभा निवडणूक अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख असूनही कल्याण ग्रामीणमधून महायुतीने आपला अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. येथून मनसेचे आमदार राजू पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्यात लढत रंगली आहे. महायुतीकडून शिंदे गटचे राजेश मोरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे मात्र याविषयी सैनिक येथे आळीमिळी गुपचिळी साधून आहेत. महायुती येथे कोणता डाव खेळते यावर येथील लढतीची गणिते ठरणार आहेत.