कामठी : हिंदू असो, मुस्लिम असो, मागासवर्गीय असो, प्रत्येकाचे हित तुम्ही दिलेल्या उमेदीत आहे. जात-पात आणि धर्मभेद विसरून एकत्र येऊन कामठीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी मदत करावी. १५ वर्षे कामठीच्या विकासासाठी काम केले. पुढील पाच वर्षेही तुम्ही दिलेला विश्वास जपत राहील, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच भाजपा -महायुतीचे कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.