मागील दोन वर्षांत राज्यातील सरकार एकही नवा उद्योग आणू शकले नाहीत, असा दावा ठाकरे यांनी यावेळी केला.
देवगड : महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि गुजरातमध्ये (Gujarat) रांगोळी, असे चालणार नाही, असे ठाकरेगट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी येथे ठणकावले. ‘पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प येथे नकोत. शाश्वत विकासाचे प्रकल्प कोकणी माणसाला हवे आहेत. त्यासाठी राज्यासह येथील मतदारसंघात परिवर्तनसाठी ‘मशाल’ पेटवावीच लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.’