विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये पहिल्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रमोद जठार यांनी तत्कालीन काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र फाटक यांच्यावर निसटता विजय मिळवला होता.
देवगड : कणकवली विधानसभा मतदारसंघामधील (Kankavli Assembly Constituency) भाजपची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम उमेदवाराच्या चाचपणीत असल्याचे दिसते. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे; मात्र पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवाराचे जनमत, विजयाच्या समीप जाण्यासाठी आवश्यक रणनीती या सर्वांचा विचार करून उमेदवाराची घोषणा होणार असल्याचे दिसते. त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम आहे. दरम्यान, भाजप उमेदवार नीतेश राणे (Nitesh Rane) यांची प्रचाराची रणनीती सुरू झाली आहे.