कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये २ लाख २९ हजार ५९२ इतके मतदार आहेत. तीनही तालुक्यांमध्ये ३३२ मतदान केंद्रे आहेत.
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये (Kankavli Assembly Constituency) नीतेश राणे (Nitesh Rane) हे तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. यावेळेस शिवसेना ठाकरे गटाकडून संदेश पारकर (Sandesh Parkar) यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बहुरंगी लढत दिसली तरी खरी लढत ही भाजप महायुती आणि महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटातच होईल. राणे हे हॅट्रिक करणार की पारकर आपल्या कौशल्याने विजय खेचून आणणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.