मराठा समाजाची उमेदवारी असती, तर प्रमुख लढतीतील नेत्यांना मतविभागणीचा फटका बसला असता.
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून (Karad South and North Assembly Constituency) मराठा समाजातील ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे मतविभागणीच्या मोठ्या धोक्याचे संकट दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख लढतीतील उमेदवारांसमोर उभे राहिले होते. मात्र, संबंधितांनी मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे घेतले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील मतविभागणी टळली जाणार असल्याने प्रमुख लढतीतील नेत्यांची धाकधूक थोडी कमी झाली आहे.