पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे अतुल भोसले यांच्यात थेट लढत होत आहे. यंदा त्यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे.
कऱ्हाड : पारंपरिक काँग्रेसच्या कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात (Karad South Assembly Constituency) भाजपने ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या मताधिक्याला घासलेल्या भाजपने विधानसभेत त्याची पुनरावृत्ती व्हावी, यासाठी महायुतीच्या माध्यमातून वेगळी फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या विरोधात व्यूहरचना आखण्यासाठी भाजपसहित महायुतीने नेते अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या मागे ताकद लावली आहे.