''छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभाव जपला. ‘बटेंगे तो कटेंगे’चे नरेटिव्ह पहिल्यांदा कुणी वापरलं, तर ते इंग्रजांनी.''
कऱ्हाड : राज्यात दहा वर्षांपासून भाजप सरकार (BJP Government) आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. त्यावर ते आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. त्या विचाराला पाठीमागे टाकण्यासाठी युवकांनी योग्य विचारांना साथ द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Adv. Uday Singh Patil-Undalkar) यांनी केले.