''पृथ्वीराज चव्हाणांनी गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. देशात ७० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले.''
कऱ्हाड : लाडकी बहीण योजनेला (ladki Bahin Yojana) निवडणुकीचा जुमला म्हणून हिणवणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) निवडणुकीत धडा शिकवा. महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत. या उलट कोरोनाच्या काळात डॉ. अतुलबाबा भोसले लाडक्या बहिणींच्या पाठीशी भावासारखे उभे राहिले. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी महिलांसह जनतेला सेवा दिली. अशावेळी भागातील लोकप्रतिनिधी काय करत होते, असा सवाल भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.