''महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत, की त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली आहे.''
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री एवढे शांत आहेत आणि त्यांच्यासमोर दोनवेळा पडलेला समोरचा उमेदवार पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा त्यांच्याकडून येतो कोठून? असा सवाल शिवसेनेच्या (Shiv Sena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला.