Karmala Assembly Election 2024 : करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नारायण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी अपक्ष लढणार असल्याचे घोषित केले आहे. याशिवाय भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी दिग्विजय बागल यांच्या नावाची घोषणा केली आहे.