तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

Karnataka Assembly By-election Result : या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि धजद-भाजप (BJP) युतीमध्ये कडवी लढत झाली.
Karnataka Assembly By-election Result
Karnataka Assembly By-election Result esakal
Updated on
Summary

चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत धजदचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांनी पराभवाची हॅट्‌ट्रिक केली.

बंगळूर : राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या (Karnataka Assembly Result) पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने (Congress) बाजी मारली. बदलाची अपेक्षा करणाऱ्यांना मतदारांनी जोरदार धक्का देत स्थिर राजकारणासाठी काँग्रेसला आशीर्वाद दिला. या निकालामुळे काँग्रेसला संडूरची जागा राखून ठेवण्यात यश तर आलेच, शिवाय धजदची चन्नपट्टण व भाजपची शिग्गावची जागा हिसकावून घेण्यातही यश आले. त्यामुळे आता काँग्रेस सदस्यांची विधानसभेतील संख्या आता १३८ वर गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.