"महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आघाडी सरकारने गृहलक्ष्मी योजनेची कॉपी करून तिला ‘माझी लाडकी बहीण योजना’ असे नाव दिले."
बंगळूर : ‘‘स्त्रीची प्रगती झाली तर कुटुंबाची प्रगती होते, राज्य, गावाची प्रगती होते. म्हणूनच महिलांच्या विकासाला पूरक म्हणून आमच्या हमी योजना आखण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आघाडी सरकारने गृहलक्ष्मी योजनेची कॉपी करून तिला ‘माझी लाडकी बहीण योजना’ असे नाव दिले आणि १५०० रुपये दिले. आम्ही ‘गृहलक्ष्मी’चे (Gruhalakshmi Yojana) नाव ठेवले आणि तीन हजार देण्याचे वचन दिले; पण तेथील भाजप आघाडी सरकारने निवडणुकीच्या सहा महिने आधी पैसे दिल्याने आमच्याहून अधिक मते मिळाल्याची टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केली.