Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Karveer Assembly Election Results 2024 Rahul Patil vs Chandradip Narke : करवीर मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
Karveer Assembly Election Results 2024
Karveer Assembly Election Results 2024esakal
Updated on

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी 2314 मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

21व्या फेरीत नरके यांचे लीड काहीसे कमी झाल्याचे पहायला मिळाले. तर, तेविसाव्या फेरीत यात आणखी घट झाल्याचे पहायला मिळाले. 26 फेरी पैकी 24 फेरी अखेर चंद्रदीप नरके यांना 5604 ची आघाडी घेतली. तर, उर्वरित दोन फेरीत हे लीड आणखी कमी झाल्याचे पहायला मिळाले. असे असले तरी 2 हजारांच्या आसपास मताधिक्याने चंद्रदीप यांनी बाजी मारत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यात यश मिळवले आहे.

यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघातील लढत भावनिकतेच्या मुद्द्यावर लढवली गेली. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील (Rahul Patil) यांनी मतदारांना भावनिक साद घालत प्रचाराचा मुद्दा हाताळला. तर, दुसरीकडे मतदारसंघातील विकासकामांची शिदोरी घेत महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके मतदारापर्यंत पोहचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.