महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वोट जिहादाचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यातच कोकणातून बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. या पार्श्वभूमीवर, मालेगाव पोलिसांनी बुधवारी व्होट जिहाद प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक केली.