महापालिकेतील राजकारण करत आमदार पदापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. आमदार जयश्री जाधव वगळता इतर आमदारांनी त्यावरून मार्गक्रमण केलेले नाही.
कोल्हापूर : महापालिकेतील नगरसेवक, महापौरपद तसेच इतर पदे भूषवल्यानंतर आमदारकी खुणावणे स्वाभाविक आहे. सध्या महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक ‘उत्तर’चा आमदार होण्याची इच्छा बाळगून आहेत. पण, आतापर्यंत आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) वगळता इतर कुणालाही आमदार होता आलेले नाही. आमदार जाधव या महापालिकेत प्रथमच भाजपच्या (BJP) नगरसेवक म्हणून निवडून गेल्या व त्यानंतर पती चंद्रकांत जाधव यांच्यानंतर झालेल्या उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर आमदारही झाल्या.