'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Kolhapur Assembly Election 2024 : दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विजयासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही कंबर कसली आहे.
Kolhapur Assembly Election 2024
Kolhapur Assembly Election 2024esakal
Updated on
Summary

कोल्हापूर उत्तरमध्ये ‘पॅलेस पॉलिटिक्स आल्यामुळे ‘उत्तर’ प्रश्‍नात गुरफटले. २००५-०६ मध्ये मालोजीराजे आणि सतेज पाटील यांच्यात नगरसेवकांवरून दुफळी झाली होती. असाच काहीसा प्रकार माघारीच्या नाट्यमय घडामोडीत दिसला.

Kolhapur Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ४ ) अर्ज माघारीनंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने खडाखडी सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत धुमशान चांगलेच रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय घेतलेला आढावा...

काँग्रेसचा डाव, भाजपचा प्रतिडाव

-ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विजयासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही कंबर कसली आहे. या मतदारसंघातून ११ उमेदवार जरी रिंगणात असले तरी मुख्य लढत ही भारतीय जनता पक्षाचे अमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यातच आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना या मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. मर्यादित मताधिक्यावर काँग्रेसला थांबवण्यात भाजपला यश मिळाले. २०१९ च्या निवडणुकीत अमल महाडिक यांचा ऋतुराज पाटील यांनी जरी पराभव केला असला तरी त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे विधानसभेची लढाई दोन्ही उमेदवारांना सोपी नाही. आमदार सतेज पाटील यांचा या मतदारसंघातील लोकसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे भाजपला हा मतदारसंघ सहज जिंकता येणारा नाही. उमेदवारी जाहीर होण्याआधीच या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे ‘फलक युद्ध’ रंगले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()