राजेश लाटकरांची नाराजी दूर होणार? अरुण दुधवडकर, सतेज पाटलांवर धुरा; 'पॅचअप' करण्यासाठी आघाडीत खलबते

Kolhapur Assembly Election : महायुतीत (Mahayuti) जिल्ह्यात एकाही जागेवर बंडखोरी होणार नाही, यासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न झाले.
Kolhapur Assembly Election
Kolhapur Assembly Electionesakal
Updated on
Summary

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची नाराजी लवकरच दूर केली जाणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जेथे नाराजी आहे तेथे ‘पॅचअप’ करण्यासाठी आज शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये खलबते झाली. दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांकडून मदत झाली पाहिजे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचाही निर्णय बैठकीत झाला. दरम्यान, आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या ‘राधानगरी’ आणि ‘शाहूवाडी’ मतदारसंघातसुद्धा बैठका घेण्याचा निर्णय झाला. ठाकरे सेनेचे कार्यकर्ते जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करतील, असा विश्‍वास संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.