'महाराष्ट्र ही संतांची शाहू-फुले-आंबेडकरांची भूमी, भाजपकडून पुरोगामी महाराष्ट्राला बदलण्याचा प्रयत्न'; थोरातांचा निशाणा

Kolhapur Assembly Election Congress leader Balasaheb Thorat : भाजप व महायुती राज्यात फसवाफसवी करून पुरोगामी महाराष्ट्राला बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Congress leader Balasaheb Thorat
Balasaheb Thorat esakal
Updated on
Summary

"लोकसभेला मोदी व भाजपचा अहंकार मोडण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले. येत्या निवडणुकीत महायुतीला पराभूत करा व महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करा."

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र ही संतांची शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमी आहे. मात्र, भाजप व महायुती राज्यात फसवाफसवी करून पुरोगामी महाराष्ट्राला बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. ५० खोके देऊन सत्ता स्थापन केली जात असून, ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी का थांबविली, याचे उत्तर द्यायला ते तयार नाहीत. या सरकारला केवळ सत्ता लाडकी असून, राज्यात महागाईचा आगडोंब झाला असून, या भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेवरून घालवा,’ असे आवाहन काँग्रेसचे (Congress) नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.