भगवा चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार सतेज पाटील तर तेथून काही अंतरावरच राजेश क्षीरसागर यांच्या वाहनांचा ताफा वळण घेत होता. हा ताफा तसाच खाली गेला असता तर कदाचित अनर्थ घडला असता.
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena Thackeray Group) कार्यकर्ता व शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख यांच्यात ‘गद्दार’ शब्दावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मोठ्या राड्यात झाले. त्यातून ‘उत्तर’चे शिंदे सेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे काही अंतरावर आमने- सामने आल्याने कसबा बावड्यातील भगवा चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला.