राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर १९९९ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढली.
Kolhapur Assembly Election Flashback : कोल्हापूर शहराच्या २००४ च्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकत्र होती आणि कोल्हापूर शहरची जागा काँग्रेसला गेली. पण, तगडा उमेदवार नव्हता. त्याचवेळी माजी आमदार मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. एका रात्रीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, कै. विलासराव देशमुख आणि अन्य नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला आणि मालोजीराजे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांच्या गळ्यात उमेदवारीसह आमदारकीच्या विजयाचीही माळ पडली.