''महाविकास आघाडी सरकारने एक रुपायाही दिला नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता विरोधकांना धडा शिकवेल."
कोल्हापूर : ‘महायुती सरकारने (Mahayuti Government) वीज बिल माफ केले, पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले. महिलांना साडेसात हजार रुपये दिले. आरोग्य योजना राबवल्या. एका अर्थाने राज्यातील गावगाड्याच्या विकासाला चालना दिली. महाविकास आघाडी सरकारने एक रुपायाही दिला नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता विरोधकांना धडा शिकवेल. महायुतीचे पांडव आघाडीच्या कौरवांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत,’ अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.