"सांगलीत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी एका प्रचार सभेत ‘मी बंटी पाटील यांच्यासारखा वागलो तर जिल्ह्यात एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, असे सांगितले. यावरून सतेज पाटील यांची प्रवृत्ती दिसून येते."
कोल्हापूर : ‘फुलेवाडीत प्रचारसभेत केलेल्या महिलांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्याबाबत, ‘माझे हात तोडा, लाथा घाला’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रत्येक भाषणात सांगत आहेत. मला त्यांची माफी मागायची आहे. मला आव्हान द्यायचे नाही. परंतु, या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही’, असा टोला खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लगावला.