१९५७ च्या निवडणुकीत कै. बराले हे पक्षांतर्गत गटबाजीमुळे शेकापपासून दुरावले. १९६२ च्या निवडणुकीत तर त्यांना निवडणुकीतूनच बाहेर पडावे लागले.
Kolhapur Assembly Election Politics Flashback : घरी अठरा विश्व दारिद्र्य, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत घेतलेले शिक्षण, शालेय शिक्षण घेताना एक दिवसाच्या जेवणासाठीही मारामार, प्लेगच्या साथीमुळे शहरापासून लांब राहण्याची मिळालेली शिक्षा, फी नसल्याने वर्गातून हाकलून दिल्याने त्या-त्या विषयात नापास व्हावे लागले, अशा संकटांवर मात करत कोल्हापूर शहराचे पहिले आमदार म्हणून कै. बळवंतराव धोंडो तथा बी. डी. बराले (B. D. Barale) यांनी १९५२ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या (Shetkari Kamgar Paksh) चिन्हावर विजय मिळवला.