विधानसभा निवडणूक लढवण्याचे उद्दिष्ट असलेल्या नेत्यांचे तसे लोकसभा निवडणुकीत फारसे अडले नव्हते, पण तेव्हापासूनच अनेकांनी भविष्यातील वाटचाल निश्चित केली असावी, असे वाटते.
कोल्हापूर : कुणी ‘सासूसाठी वाटणी केली व सासूच आली वाटणीला’ अशा स्थितीतून कुणी आघाडी धर्मामुळे झालेल्या कोंडीतून, तर कुणी उमेदवारीसाठी केलेल्या तडजोडीतून निवडणुकीसाठी आयत्यावेळी वेगळ्या पक्षाच्या झेंडा हाती धरला; पण पदरी अपयश पडलेले हे नेते आगामी काळात करणार काय? हा मोठा प्रश्न आहे. जी वाट निवडली तिथेच राहायचे ठरवले तर सत्तेबाहेर राहावे लागेल. अन्यथा वेगळा विचार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.