शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले. त्यानंतर मात्र ‘कट्टर’ आणि ‘गद्दार’ असा गट होऊ लागला.
कोल्हापूर : एकेकाळी जिल्ह्यात दहापैकी पाच आमदार असलेल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला (Shiv Sena) त्यांची स्वतंत्र ताकद दाखविणारी ही निवडणूक आहे. ज्याच्या ताकदीवर शिवसेना पक्ष मोठा झाला त्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सेना आता ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ झाली आहे. ‘धनुष्याबाणा’च्या ठिकाणी ‘मशाल’ आली आहे. लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीत नवे नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्याचे पक्षांसमोर आव्हान आहे.